बेळगाव येथील वरिष्ठ वकील कमलकिशोर जोशी यांची जिल्हा ग्राहक न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली आहे.
ॲड. कमल किशोर जोशी या पदाकरिता झालेल्या लेखी परीक्षेत तसेच कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ग्राहक व्यवहार सचिव आणि कर्नाटक सरकारने मुख्य सचिव यांच्या समावेश असलेल्या निवड समितीने घेतलेल्या मुलाखतीत यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले.
ग्राहक न्यायालयाचे खंडपीठ अध्यक्ष सदस्य व महिला सदस्य असे तीन सदस्यांची आहेत. यातील पदाकरीता संपूर्ण कर्नाटक राज्यातील सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश तसेच वरिष्ठ वकील अशा 645 उमेदवाराने अर्ज केले होते त्यातून ॲड. कमलकिशोर जोशी यांची निवड झाली आहे.
ते बेळगाव शहापूर राजस्थानी समाजातील एकमेव वकील आहेत त्यांची ग्राहक न्यायालयाने सदस्य म्हणून निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचे समाजातील सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.