बेळगाव : बेळगाव-खानापूर मार्गावरील झाडशहापूर या गावातील ब्रह्मलिंग मंदिराजवळ भरधाव वेगाने जाणारी दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
गोकाक तालुक्यातील शिवापूर-कोण्णूर या गावातील शिवानंद कबाडगी, वय २१ आणि कुमार कबाडगी, वय १९ अशी अपघातातील मृतांची नावे आहेत.
दुचाकीवरून एकूण तिघेजण जात होते. दरम्यान अति वेगामुळे हा अपघात झाला आहे.
सदर युवक अशोक आयर्न प्लांटमध्ये कामाला होते. बेळगाव ग्रामीणचे सीपीआय सुनील कुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.