फोटोशूट बेतला जीवावर-फोटोशूट ही तरुणाईची फॅशन बनली आहे.फोटोशूट करण्यासाठी गेलेल्या तरुणाला कारने धडक दिल्याने तरुण जागीच ठार झाला,
तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला.आज कणबर्गी येथे ही घटना घडली.
बेळगाव येथील सदाशिवनगर येथील आदित्य विश्वनाथ करडी (19) नावाचा तरुण सिद्धेश्वर मंदिराकडे जात असताना एका तरुणीचा फोटो काढत असताना भरधाव कारने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी बेळगाव येथील उत्तर वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.