बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील तिघे आमदार आपल्या संपर्कात आहेत. ते कधीही भाजप मध्ये दाखल होऊ शकतात आणि मी सांगेन तिकडे जायची त्यांची तयारी आहे.
असा पॉलिटिकल बॉम्ब फोडून माजी मंत्री व गोकाक चे आमदार रमेश जारकिहोळी यांनी संपूर्ण कर्नाटकात धुमाकूळ घातला आहे. काँग्रेस आणि भाजप अशा दोन्ही पक्षांना हादरवून सोडणाऱ्या या घोषणेमुळे चर्चा जोरात आहे.ते तिघे कोण?असा प्रश्न सध्या गांभीर्याने चर्चेत आला आहे.
बेळगाव जिल्ह्यात असलेल्या 5 काँग्रेस आमदारांकडे या विधानाने लक्ष वेधले गेले आहे.या पाचपैकी तीन कोण याचा शोध सुरू झाला आहे. गणेश हुक्केरी, सतीश जारकिहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर,अंजलीताई निंबाळकर आणि महांतेश कौजलागी या पाच पैकी रमेश जारकीहोळी यांच्या संपर्कात असणारे तिघे कोण असतील याबद्दल राजकीय चर्चांना ऊत आला आहे.
या विधानानंतर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या आहेत. पालकमंत्री गोविंद कार्जोळ यांनी रमेश हे पावर फुल आहेत.ते संपूर्ण विरोधी पक्षालाच भाजप मध्ये आणू शकतात असे विधान केले आहे.तर काँग्रेस नेते सिद्ध रामय्या यांनी रमेश यांच्यावर टीका करून ना त्यांच्या संपर्कात आहे आणि ते स्वतः एकदा सोडून गेलेत यामुळे पुन्हा त्यांना घेणे अवघड आहे.अशी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीला अजून एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना उमटत असणाऱ्या या प्रतिक्रिया आणि रस्सीखेच पाहता येती निवडणूक अधिक गोंधळाची असेल यात शंका नाही.