मागील दीड वर्षापूर्वी पासून कोरे गल्ली जेड गल्ली या भागात ड्रेनेज वाहिनी मुळे विहिरींचे पाणी दूषित होत आहे. या संदर्भात वारंवार आरोग्य अधिकाऱ्यांना तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही.
यामुळे नागरिक त्रासले आहेत. संबंधित ड्रेनेज वाहिनी महानगरपालिकेकडून तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्त केली जाते. मात्र पुन्हा त्यातील दूषित पाणी विहिरीमध्ये मिसळू लागले आहे. यामुळे नागरिकांना रोगांचा सामना करावा लागत आहे.
दूषित पाणी थेट विहिरीत येऊ लागल्यामुळे पाणी दुषित होऊन ते नागरिकांना प्यावे लागत आहे. यासंदर्भात तक्रार केली असता दखल न घेणार्या महानगरपालिका आरोग्य विभागाची तक्रार आता कोणा कडे करायची असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
यासंदर्भात आता महानगर पालिका आयुक्तांनी तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
विहिरी दूषित होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना हाती घ्यावी. अन्यथा विहिरीचे पाणी वापरण्याजोगे राहणार नाही. याची दखल घ्यावी .असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे.