कर्नाटक राज्य सरकारने आज एक नवीन निर्णय घेतला असून कोविड संदर्भातील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. यापूर्वी 19 जानेवारीपर्यंत हे निर्बंध असतील असे सांगण्यात आले होते. मात्र नवा आदेश काढून 19 जानेवारी पर्यंत लागू असलेले सर्व निर्बंध 31 जानेवारीच्या पहाटे पाच वाजेपर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कर्नाटकाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. या काळात शाळा सुरु की बंद या संदर्भातील निर्णय संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी घेऊ शकतात.
सर्व प्रकारची निवेदने, आंदोलने व मोर्चा या प्रकारचे कृत्य करण्यास पूर्णपणे निर्बंध घालण्यात आला आहे.
सर्व बस रेल्वे आणि प्रवास यंत्रणा आसन क्षमतेप्रमाणे सेवा देऊ शकतात.
याच प्रमाणे सर्व राज्यांच्या सीमा रेषांवर आवश्यक ती डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आली असून दोन लस आणि rt-pcr निगेटिव असलेल्या व्यक्तींनाच कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जाणार आहे. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्या ज्या पद्धतीने काळजी घेण्यात येते आहे ती 19 तारखेपासून 31 तारखेपर्यंत पुन्हा घेण्यात यावी अशा सूचना सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याची माहिती कर्नाटकाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.