कोरोना चे रुग्ण वाढू नयेत म्हणून कर्नाटक सरकारने जारी केलेला वीकेंड कर्फ्यु आज पासून सुरू होणार आहे .शुक्रवारी रात्री दहा पासून सोमवारी पहाटे पाचपर्यंत कर्फ्यु असेल असे
कर्नाटक सरकारने जारी केले असले तरी त्यासाठी जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकात मात्र शुक्रवारी रात्री आठ पासून असे म्हटले आहे .त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून सरकारने लवकरात लवकर हा संभ्रम दूर करण्याची गरज आहे .
कर्फ्यु ची अंमबजावणी आज रात्री पासून होणार असून यासंदर्भात या परिपत्रकामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. तो दूर करण्याची मागणी केली जात आहे.
योग्य त्या सूचना वेळेत केल्या जाव्यात. व्यापार उद्योग व नागरिकांचा वावर आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने योग्य ती सूचना करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
विकेंड कर्फ्यु रात्री 8 की 10 पासून? pic.twitter.com/CxBIzrY3O4
— Belgaumlive (@belgaumlive) January 7, 2022