मुख्यमंत्री बसवराज बोम्मई त्यांनी कर्नाटकात विकेंड कर्फ्यू सुरू ठेवायचा की नाही याचा निर्णय घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारने राज्यात संपूर्ण लॉक डाऊनची कोणतीही शक्यता नाकारली आहे, अशी माहिती महसूलमंत्री आर अशोक यांनी दिली.
कोविड -19 तांत्रिक सल्लागार समिती सोबत मुख्यमंत्री बोम्मई यांच्या बैठकीनंतर महसूल मंत्री अशोक पत्रकारांशी बोलत होते. कोरोनाची तिसरी लाट 25 जानेवारीच्या आसपास शिखरावर येऊ शकते त्यानंतर प्रकरणांमध्ये घट होईल, असे ते म्हणाले. तज्ञांचा हवाल देऊन त्यांनी महाराष्ट्रात आणि दिल्लीच्या ट्रेंडची तुलना केली.
पहिली लाट चार महिन्यात तर दुसरी लाट तीन महिन्यात शिखरावर पोहोचली होती. यावेळी सुमारे महिनाभरात ती शिखरावर येईल. जरी तुम्ही महाराष्ट्र आणि दिल्लीला मापदंड म्हणून घेतले तरी कर्नाटकात प्रकरणे कमी होऊ लागली आहेत. 25 जानेवारीच्या अधिक किंवा उणे दोन दिवस लाट शिखरावर असेल. त्यानंतर प्रकरणे कमी होतील, असे तज्ञांनीही त्यांच्या अहवालात म्हंटले आहे.
शुक्रवारच्या बैठकीत सरकार आठवड्याच्या वीकेंड कर्फ्यू आणि नाईट कर्फ्यूवर निर्णय घेईल ,असे मंत्री अशोक यांनी स्पष्ट केले. शनिवारी व रविवारीच्या कर्फ्यूला विरोध करणाऱ्या हॉटेल उद्योगाबाबत बोलताना सरकार केवळ उद्योग क्षेत्रातील एका वर्गाच्या हितासाठी नियम शिथील करू शकत नाही. जर संसर्ग वाढला तर ती सरकारची जबाबदारी आहे. आम्हाला राज्याच्या व्यापक हितासाठी निर्णय घ्यावा लागेल असे ही महसूलमंत्र्यांनी सांगितले.