बेळगाव शहरातील वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या (व्हीसीसी) 11 युवा सायकलपटुंनी सायकलिंगमध्ये नवा इतिहास रचताना ऑडेक्सची द सुपर रँडीओर्स सिरीज (एसआर टायटल) यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.
एसआर टायटल शर्यत पूर्ण करणाऱ्या वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या या 11 युवा सायकल पटवून मध्ये रोहन हरगुडे, इंद्रजीत हलगेकर, जसविंदरसिंग खुराना, धीरज भाटे, चाणक्य गुंडप्पनावर, अरविंद खंडागळे, विवेक गुलबानी, अरुण पाटील, अमन नदाफ, राधाकृष्ण नायडू व सतीश बागेवाडी यांचा समावेश आहे.
सदर एसआर टायटल सायकल शर्यत 200 कि.मी. (बेळगाव -हुबळी विमानतळ -बेळगाव), 300 कि.मी. (हुबळी -शिकारपूर -हुबळी), 400 कि.मी. (बेळगाव -कराड -काशील -बेळगाव), 600 कि.मी. (तवंदी घाट -कराड -अतीत -हुबळी -तवंदी घाट) अशा अंतराची होती.
ही शर्यत वेणूग्राम सायकलिंग क्लबच्या सायकलपटुंनी निर्धारित 36 दिवसात पूर्ण केली. याबद्दल सदर सायकलपटुंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.