Monday, December 30, 2024

/

Big Breaking ‘राज्यद्रोहाच्या गुन्ह्यात बेळगाव कोर्टाने दिला जामीन’

 belgaum

गेल्या डिसेंबर महिन्यात शहरातील अनगोळ येथील क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची मोडतोड केल्याप्रकरणी पोलिसांनी राजद्रोहासह विविध गुन्हे दाखल केलेल्या चार मराठी युवकांपैकी एकाला आठव्या जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला असून अन्य एकाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेल्या युवकाचे नांव सुरज कंग्राळकर असे आहे. गेल्या महिन्यात बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनाच्या घटनेनंतर बेळगावात क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळा विटंबनेचा प्रकार घडला होता. याप्रकरणी टिळकवाडी पोलिस स्थानकामध्ये गेल्या 18 डिसेंबर 2021 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

टिळकवाडी पोलिसांनी रायण्णा पुतळा विटंबनेचा कारणीभूत ठरवून सुरज कंग्राळकर व ज्योतिबा भांदुर्गे यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांवर भादवि 153, 295, 427, 34 आणि 124 -ए कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. राजद्रोहाच्या (124 -ए) गुन्ह्यांसह इतर गुन्हे दाखल केलेल्या या युवकांपैकी सुरज कंग्राळकर याला गेल्या 24 डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले आहे.Adv pratap yadav

सदर खटल्याची आज सुनावणी झाली यावेळी सदर युवकांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणे अघटनात्मक असल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्यानंतर अखेर न्यायालयाने सुरज कंग्राळकर याला 1 लाख रुपयांच्या हमीपत्रावर जामीन मंजूर केला आहे.

त्याचप्रमाणे अन्य एक आरोपी ज्योतिबा भांदुर्गे याला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदरची माहिती संशयितांचे वकील ॲड. प्रताप यादव यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.