सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या टीम राहुल सतीश जारकीहोळी (आरएसजे) यांच्यातर्फे कडोली (ता. जि. बेळगाव) येथे कोरोना संदर्भात जनजागृती करण्याबरोबरच आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर उस्फुर्त प्रतिसादात पार पडले.
टीम राहुल सतीश जारकीहोळी (आरएसजे) यांच्यातर्फे आज रविवारी बेळगाव तालुक्यातील कडोली गावामध्ये कोरोना संदर्भात जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
कडोली येथील श्री रेणुका देवी मंदिरासमोरील जागेत आयोजित सदर शिबिराचे उद्घाटन माजी जि. पं. सदस्य अरुण कटांबळे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, टीम आरएसजेचे सदस्य ज्योतिबा गुट्टेणावर, निखिल सुभानजी व तेजस कोळकर यांच्या हस्ते झाले.
सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून ताप, सर्दी, खोकला या आजारांसह रक्तदाब आणि मधुमेह तपासणी देखील करण्यात आली. तसेच संबंधितांना आवश्यक सल्ला देऊन औषधी गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
कडोलीवासियांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचाराचा लाभ घेतला. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह टीम राहुल सतीश जारकीहोळी संघटनेचे सदस्य ज्योतिबा गुट्टेणावर, निखील सुभानजी, तेजस कोळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.