पाणी पुरवठा विभागाच्या व्हॉल्वमन आणि इतर कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपामुळे पाणीपुरवठ्याची दैना उडाली आहे. वेगवेगळ्या भागात पाण्यासाठी नागरिकांना दाही दिशा फिरण्याची वेळ आली आहे .
मात्र वार्ड क्रमांक 10 मधील नगरसेविकेने आपल्या भागातील नागरिकांसाठी टँकरने पाणीपुरवठा उपलब्ध केला असून यामुळे नगरसेविकेची संवेदनशीलता आले आहे .
नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या प्रयत्नातून पाटील मळा, ताशिलदार गल्ली आदी भागात टँकरमधून पाणीपुरवठा करण्यात आला. या पद्धतीने सर्व नगरसेवकांनी आपापल्या भागात पाण्याची व्यवस्था करण्याची गरज निर्माण झाली आहे.व्हॉल्वमन आणि इतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे सध्या पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अशी परिस्थिती आहे.
नागरिकांना समस्या निर्माण होत आहेत. अशा वेळी नगरसेवकांनी आता पाणीपुरवठ्याची जबाबदारी स्वीकारण्याची गरज आहे.
वैशाली भातकांडे यांनी टँकरने पाणी पुरवठा केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.