लहान मुलांना कोरोनाची लक्षणे दिसण्याचे प्रमाण कर्नाटकात सर्वाधिक बेळगाव जिल्ह्यात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एका महिन्यात संपूर्ण राज्यभरात 860 विद्यार्थी आणि 85 शिक्षकांना कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. शिक्षण खात्याच्या वतीने कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना ही आकडेवारी देण्यात आली आहे.
डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून आजवर कोरोना झालेल्या मुलांच्या आणि त्यांच्या शिक्षकांच्या आकड्यांची यादीच शिक्षण खात्याने कर्नाटक सरकारकडे दाखल केली आहे.
बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक अर्थात 160 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे उघडकीस आले आहे. या पाठोपाठ चिकमंगळूर जिल्ह्यात 144 विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे. बेंगलोर शहर, विजापूर आणि रायपूर जिल्ह्यामध्येही विद्यार्थ्यांना कोरोणा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. पहिली ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या राज्यातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या एक कोटी इतकी आहे.
यामधील एकूण 860 विद्यार्थ्यांना हा आजार झाला असला तरी ही संख्या वाढू शकते. त्यामुळे ही आकडेवारी धोकादायक ठरली आहे. काही जिल्ह्यांमधील ऑफलाइन अभ्यास वर्ग बंद केल्यानंतर पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये कमी आले असल्याची माहितीही कर्नाटक सरकारकडे उपलब्ध झाली आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी विद्यागम कार्यक्रमांतर्गत शाळा भरवल्या जाव्यात. अशी मागणी सरकारकडे केली आहे.
बेळगावातील विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आकडा जास्त आहे. ही गंभीर बाब आहे. याच पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यात ठोस निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी सतरा तारखेनंतर जिल्ह्यातील पहिली ते नववी पर्यंत च्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सरकार कोणता निर्णय घेणार हे स्पष्ट झालेले नाही.