जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दुपदरी मार्गावरील उखडलेला गतिरोधक आणि त्याचे नट-बोल्ट वाहनांसाठी विशेषकरून दुचाकी वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे या गतिरोधकाच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दुपदरी मार्गावरील राणी चन्नम्मा सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका गतिरोधकाचा दुभाजका जवळील काही भाग उखडला आहे. दुभाजकांचा संबंधित भाग निखळून पडला असल्यामुळे त्या ठिकाणचे नट-बोल्ट खुले पडले आहेत.
त्यामुळे सदर दुभाजक एका बाजूला वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. उखडलेला हा गतिरोधक अपघाताला आमंत्रण देणारा ठरत आहे. विशेष करून रात्रीच्या वेळी अंदाज न आल्यामुळे नियंत्रण सुटून ठिकाणी दुचाकींचे अपघात घडत आहेत.
या उखडलेल्या गतिरोधकाचे जमिनीतील नट बोल्ट उघड्यावर पडले आहेत. यापैकी कांही अणकुचीदार नट मुळे वाहने पंक्चर होण्याचे प्रकारही घडत आहेत.
तरी लोकप्रतिनिधींसह संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सुरक्षित वाहतुकीसाठी गतिरोधकाचा उखडलेला भाग पूर्ववत बसवावा, अशी मागणी वाहनचालकातून केली जात आहे.