Saturday, December 21, 2024

/

‘मिशन रफ्तार’मुळे वाढतोय नैऋत्य रेल्वेचा वेग

 belgaum

नैऋत्य रेल्वेतर्फे ‘मिशन रफ्तार’ ही मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती केली जात असून रेल्वे गाड्यांचा वेग वाढविण्यास सोयीस्कर केले जात आहे. 2021 -22 यावर्षात नैऋत्य रेल्वे व्याप्तीत 317 किलोमीटर पर्यंतच्या मार्गांचा वेग वाढविण्यात आला आहे. यावर सध्या 32 रेल्वे गाड्या धावत आहेत.

भारतीय रेल्वेच्या ‘मिशन रफ्तार’मध्ये प्रवासी आणि मालवाहू गाड्यांच्या सरासरी वेगात सुधारणा करण्याची योजना आहे. त्यासाठी रेल्वे ट्रॅक दुपदरीकरणासह अनेक बाबींवर काम सुरू आहे. विविध ट्रॅक सुधारण्याची कामे हाती घेऊन मजबुतीकरण केले जात आहे. रेल्वेने विभागीय गती सुधारण्यासाठी स्थानकांवरील लूप लाईनवरील वेग सुधारण्यासाठी आणि कायमस्वरूपी वेगावरील निर्बंध दूर करण्यासाठी नूतनीकरण आणि अभियांत्रिकी कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे गाड्यांची गती वाढली आहे.

डिसेंबर 2021 या चालू आर्थिक वर्षात नैऋत्य रेल्वेने उत्तम कामगिरी केली आहे. या कालावधीत 317 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या ट्रॅकचा वेग वाढविण्यात आला आहे. यात चिक्कोडी रोड -रायबाग -कुडची, आर्सीकेरे -तुरमुरी दावणगिरी -टोलाहंसे, हरिहर -देवरगुड्डा, चिकबळ्ळापूर -कोलार येलाहंका -ओद्दरहल्ली, मकालीदुर्ग -देवरापल्ले, गदग -बिंकडाकट्टी, जुलू -विजापूर आदी मार्गांचा समावेश आहे.

ट्रॅक दुपदरीकरणामुळे गाड्यांची गती सुधारली आहे. 2021 -22 मध्ये 32 एक्सप्रेस /पॅसेंजर गाड्यांचा वेग वाढविण्यात आला आहे. बेंगलोर -हुबळी, लोंढा -मिरज आणि गदक -होटगी मार्गांमध्ये दुपदरीकरण कामांचा पाठपुरावा करून वेग वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विभागीय गती वाढल्याने प्रवासाचा वेळ कमी होणार आहे, असे नैऋत्य रेल्वेचे सरव्यवस्थापक संजीव किशोर यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.