Saturday, November 16, 2024

/

कोंडुसकरसह 16 जणांना सशर्त जामीन

 belgaum

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना निषेध आंदोलन प्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्हा क्र. 89 /21 मध्ये रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 16 जणांना बेळगाव तृतीय जेएमएफसी न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशन कालावधीत बेंगलोरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर बेळगावात आंदोलन करणाऱ्या मराठी भाषिकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले.

तसेच 38 जणांना अटक करून हिंडलगा कारागृहामध्ये डांबण्यात आले आहे. अटक झालेल्या या कार्यकर्त्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यानुसार खडेबाजार पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्हा क्र. 89 /21 मध्ये आज मंगळवारी बेळगाव तृतीय जेएमएफसी न्यायालयाने कट्टर हिंदुत्ववादी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह एकूण 16 जणांना सशर्त जामीन मंजूर केला.

प्रत्येकी 25000 रुपयांचा एक जामीनदार आणि तितक्याच रकमेचे हमीपत्र, प्रत्येक तारखेला कोर्टात हजर रहावे, साक्षीदारांना धमकावू नये तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करणे या अटीवर जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये रमाकांत कोंडुसकर, भरत मेणसे, बळवंत शिंदोळकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक ईश्वर सुतार, सुनील लोहार, रोहित माळवी, विनायक संजय सुतार, गजानन जाधव, विनायक कोकितकर, दयानंद बडसकर, सुरज गायकवाड, राहुल बरली, लोकेश रजपुत व महेश मुतगेकर यांचा समावेश आहे.

खडेबाजार पोलिस स्थानकामध्ये नोंदविण्यात आलेल्या 90 /21 आणि 92 /21 या क्रमांकाच्या अन्य गुन्ह्यांमध्ये देखील रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 5 जणांना बेळगाव तृतीय जीएमएफसी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये रमाकांत कोंडुसकर, भरत मेणसे, नरेश निलजकर, लोकनाथ उर्फ लोकेश रजपूत आणि हरीश मुतगेकर यांचा समावेश आहे.

प्रत्येकी 25000 रुपयांचा एक जामीनदार आणि तितक्याच रकमेचे हमीपत्र, प्रत्येक तारखेला कोर्टात हजर रहावे, साक्षीदारांना धमकावू नये तपास अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करणे या अटीवर जामीन मंजूर झाला आहे. या सर्वांच्यावतीने वकील ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. शंकर बाळनाईक व ॲड. पट्टण हे काम पाहत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.