पोटच्या दोन्ही मुलांनी वाळीत टाकल्यामुळे निराधार झालेल्या मूळच्या सावंतवाडी येथील एका इसमाला हेल्प फाॅर नीडी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज आसरा मिळवून दिला.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, मुळचा सावंतवाडी येथील असणारा जनार्दन पेडणेकर हा सुमारे 60 -65 वर्षाचा इसम कालपासून राकसकोप रोडवरील हिंडलगा -गणेशपुर बस थांब्याच्या ठिकाणी असहाय्य अवस्थेत बसून होता.
त्या भागातच राहणाऱ्या हेल्प फाॅर नीडी संघटनेच्या कार्यकर्त्याला सुजाता राजगोळकर यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी त्या इसमाची विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपण मूळचे सावंतवाडीचे असून आपली दोन मुले इथे बेळगावात एकटा काकतीला आणि एकटा मजगावला असतो. मात्र दोन्ही मुलं मला पाहत नाहीत त्यांनी मला घराबाहेर काढले आहे अशी आपली व्यथा सांगितली.
तेंव्हा सुजाता राजगोळकर यांनी त्वरित हेल्प फाॅर निडीचे प्रमुख प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना संबंधित निराधार इसमाबाबत माहिती दिली.
तेंव्हा अनगोळकर यांनी आज सकाळी त्या इसमाला आपल्या रुग्णवाहिकेतून जुने बेळगाव येथील महापालिकेच्या निराश्रीतांच्या निवारा केंद्रामध्ये नेऊन दाखल केले. या कार्यात त्यांना सुजाता राजगोळकर आणि मंजुनाथ लमानी यांचे सहकार्य लाभले.