प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशप्रेमाचा आणि सायकल चालवा तंदुरुस्त राहा असा संदेश पंच्याहत्तर किलोमीटर सायकल चालवून बेळगावच्या आठ वर्षाच्या मुलाने दिला.
मल्हार खंडोबा कुलकर्णी या आठ वर्षाच्या मुलाने प्रजासत्ताक दिनी पंचाहत्तर किलोमीटर सायकल चालवून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा केला.
सकाळी सहा वाजता मल्हार याने आर पी डी कॉर्नर येथून आपल्या सायकल मोहिमेला प्रारंभ केला.तेथून खानापूर येथील टोल नाक्या पर्यंत जावून आर पी डी कॉर्नर मार्गे बाची पर्यंत जावून पुन्हा आर पी डी कॉर्नर येथे आला.हे एकूण पंचाहत्तर किलोमीटर अंतर मल्हार याने पाच तास पंधरा मिनिटात पूर्ण केले.
या सायकल मोहिमेच्या वेळी त्याचे वडील खंडोबा कुलकर्णी ,आई आणि निवेदिता कुलकर्णी आणि वेणुग्राम सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी साथ दिली.
यापूर्वी देखील मल्हार याने पन्नास किलोमिटर सायकल सलग चालवण्याची मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली होती.मल्हार हा आर्मी प्रायमरी स्कूल मध्ये दुसरीत शिकत आहे.त्याला बुद्धिबळ खेळण्याची देखील आवड आहे.सायकलिंग बाबतीत त्याच्या वडिलांचे मार्गदर्शन त्याला लाभत आहे.