माहिती हक्क कायद्यांतर्गत अर्जदाराला माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल बेळगाव तहसीलदार कार्यालयातील शिरस्तेदाराला माहिती हक्क आयोगाने 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
माहिती हक्क अधिकारांतर्गत अर्जदाराला माहिती देण्यास टाळाटाळ केल्याबद्दल तहसीलदार कार्यालयातील माहिती अधिकारी पी. आर. संतोष यांना हा 5 हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अर्जदार व्यक्तीने सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार केल्यामुळे उपरोक्त कारवाई करण्यात आली. त्यानुसार दंडाची रक्कम आता संतोष यांच्या पगारातून कापून घेतली जाणार आहे.
सदरच्या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.