*राजद्रोह गुन्ह्यातील बेळगांव , कर्नाटक मधील शिवभक्तांना न्याय मिळाला पाहिजे* -*चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालण्याचे आवाहन*
छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या ३८मराठी तरुणावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे. *हे तरुण गेले महिनाभर तुरुंगात खितपत पडले आहेत.*
राष्ट्रपुरुष छत्रपती शिवरायांच्या अवमानाविरुध्द लढणाऱ्या या शिवभक्तांवर राजद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची कन्नड प्रशासनाची कृती शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोहचवणारी आहे. या अन्यायी कारवाई प्रश्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांनी लक्ष घालावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी चर्चेत कर्नाटक राज्यात आपल्या पक्षाचे सरकार असून आपण याप्रश्नी लक्ष घालून मा. मुख्यमंत्री कर्नाटक यांचेशी संपर्क साधावा व राजद्रोहाचा गुन्हामागे घेण्याविषयी गांभीर्याने प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
या प्रसंगी आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री यांना तातडीने पत्र पाठवून आपल्या भावना कळवितो व प्रत्यक्ष फोन वरून संपर्क साधून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, अवधुत पाटील आदी उपस्थित होते.