कस्टम आणि महसूल विभागात उच्च पदावर कार्य करीत असताना दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बेळगाव जवळील लोंढा येथील अजित विश्राम सावंत यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनी हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.
सद्या अजित सावंत हे डी जी जी आय, मुंबई येथे वरिष्ठ इंटलीजंस अधिकारी म्हणून सेवा बजावत आहेत. इंटलीजंस इन्स्पेक्टर पदी असताना त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.या पुरस्कारासाठी
भारतातील 28 जणांची निवड झाली असून त्यामध्ये अजित सावंत यांनाही बहुमान मिळाला आहे.
लोंढा येतील अजित सावंत हे 1987 मध्ये केंद्रीय अबकारी खात्यात रुजू झाले.मुंबई येथे त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.
महसूल विभागाशी संबंधित अनेक घोटाळे,स्मगलिंग, कर चुकवेगिरी आणि आता जी एस टी फ्रॉड्स वर पाळत ठेऊन दोषींवर कारवाई ही जबाबदारी ते निभावत असून खात्यातील उच्च पदावर पोहोचले आहेत.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने लोंढा आणि बेळगाव परिसराची मान अभिमानाने उंचावली आहे.