कोविड ची प्रकरणे मोठ्या संख्येने वाढत चालल्यामुळे कर्नाटकात एक फेब्रुवारीपासून लॉकडाऊन जारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणी सरकारी पातळीवर जोरदार चर्चा सुरू असून सल्लागार समितीने सरकारसमोर तसा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत तज्ञ समितीने लॉक डाऊन करणे गरजेचे असल्याचे मत मांडले आहे.
दररोज covid-19 ची प्रकरणे वाढू लागल्यामुळे आता लॉक डाऊन शिवाय पर्याय नाही. असे सल्लागार समितीने सांगितल्यावरून एक फेब्रुवारीपासून लॉकडाउन जारी करण्याची शक्यता असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे .या प्रकरणी आता सरकार कोणता निर्णय घेणार हे स्पष्ट नाही.
लॉक डाऊन होणारच असा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र कोणत्याही वेळी जाहीर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांनी पूर्वतयारी करण्याची गरज व्यक्त होत आहे. लॉक डाऊन काळात कोणत्याही गोष्टी कमी पडू नयेत या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.