पद्मश्री पुरस्काराने सन्मानित व्यक्तींमध्ये बेळगाव जिल्ह्यात जन्मलेल्या आणि पर राज्यात वास्तव्यास असलेल्या एका सुपुत्राचा गौरव झाला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम के हुबळी गावात जन्मलेल्या बाळेश उर्फ बाळाप्पा चिरुबसप्पा बजंत्री यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बाळेश बजंत्री यांचा जन्म 1958 मध्ये एमके हुबळी गावात झाला. 80 आणि 90 च्या दशकात ते संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी बेंगळूर ला गेले.तेथून ते तामिनाडूला गेले.

बाळाप्पा बजंत्री एमके हुबळी येथे दरवर्षी यायचे आणि त्यांनी आपल्या मोठ्या भावासह आणि कुटुंबासह उत्सव साजरा केला आहे.
तामिळनाडूमध्ये वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या बाळाप्पा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ही बाब बेळगाव जिल्ह्यासाठी सन्मानाची ठरली आहे.