वाढता कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनासह आरोग्य खाते आपल्यापरीने प्रयत्न करत असताना देखील बेळगाव जिल्ह्यात आज नव्याने 70 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्याने आढळून आलेल्या या रुग्णांमुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह अर्थात सक्रिय रुग्णांची संख्या 415 झाली आहे.
बेळगाव जिल्ह्यात आज शनिवारी नव्याने 70 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. परिणामी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता 415 इतकी वाढली आहे.
जिल्ह्यात आज कोरोनामुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्यामुळे मृतांचा एकूण आकडा 948 इतका स्थिर आहे. या नववर्षात 1 जानेवारीपासून आजतागायत जिल्ह्यात अनुक्रमे 10, 12, 15, 45, 31, 64, 114 आणि आज 70 इतक्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, आज राज्यात एकूण 8906 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान गेल्या 24 तासांत विकेंड कर्फ्युचे उल्लंघन करणाऱ्यावर बेळगाव पोलिसांची कारवाई केली आहे यात 39 वाहन जप्त तर
258 विना मास्क फिरणाऱ्यावर दंड वसूल केला आहे