कर्नाटकातील किनारपट्टी भागाला राज्याच्या इतर भागात जोडण्यासाठी मंगळूर येथून नव्या तीन रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे विभागाकडे आहे.
यातील एक रेल्वे मंगळूर मिरज या मार्गासाठी असणार असून ती आर्सीकेरे हसन या मार्गे जाणार आहे. त्यामुळे बेळगावच्या प्रवाशांना मंगळूरला पोहोचणे सोयीचे होणार आहे .त्यामुळे ही रेल्वे लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी प्रवासी करत आहेत.
उत्तर कन्नड जिल्ह्याचे खासदार नवीन कुमार कटील यांनी नव्या तीन रेल्वेची मागणी केली आहे .तिरुपती येथील बालाजीचे अनेक भक्त असून मंगळूर ते तिरुपती रेल्वे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
मंगळूर अहमदाबाद व्हाया बेळगाव रेल्वेचे मागणी त्यांनी केली असून रेल्वे विभागाच्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडला आहे.मंगळूर येथे अनेक शिक्षण संस्था असल्याने बेळगाव मिरज या परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी तेथे जातात.
त्याच बरोबरीने व्यवसाय उद्योग निमित्त अनेकजण मंगळूर येथे स्थायिक झाले असल्याने रेल्वे सुरू करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून होती. ही रेल्वे सुरू झाल्यास पर्यटनालाही चालना मिळणार आहे.