Sunday, December 29, 2024

/

‘त्या’ वक्तव्याचा खानापूर समितीने केला निषेध-

 belgaum

परप्रांतातून येऊन खानापुरात आमदार की मिळवणाऱ्यांनी इथल्या मूळ निवासी जनतेला शिकवू नये, निवडणुकीपूर्वी मराठी मते मिळवण्यासाठी मराठी भाषा आणि संस्कृती चा आग्रह धरणाऱ्यानी कन्नड धार्जिण्या नेत्यांना खूष करण्यासाठी मराठी जनतेच्या विरोधात गरळ ओकून खायचे दाखवले आहेत, भविष्यात तालुक्यातील मराठी भाषक जनता त्यांना नक्कीच त्यांच्या घरचा रस्ता दाखवतील असे विचार तालुका म.ए. समितीचे कार्याध्यक्ष मारुती परमेकर यांनी मांडले.

शिवस्मारक येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची शुक्रवारी बैठक संपन्न झाली त्याप्रसंगी ते बोलत होते, खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी इटगी ता.खानापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात कर्नाटक राहणाऱ्या इथल्या मातीशी गद्दारी करणाऱ्या राज्य द्रोह्यांनी हा भाग सोडून त्यांना तिकडे जायचे आहे तिकडे जावे असे वक्तव्य केले खरे तर त्यांनी अप्रत्यक्षरीत्या इथल्या तालुक्यातल्या मराठी जनतेला अनुसरून हे वक्तव्य केले असल्याचा आरोप समितीने त्यांनी केला.

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण युवा समिती चे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले मुंबई प्रांतात असलेला हा भाग पूर्वीपासूनच महाराष्ट्राचा भूभाग आहे त्यामुळे आम्ही आमचा हा भाग महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी महाराष्ट्र एकीकरण सीमा चळवळीच्या माध्यमातून गेली 65 वर्षे संघर्ष करतो आहोत, हा लढा निर्णायक वळणावर असताना मातृभाषा मराठी आणि मराठी संस्कार असलेल्या आमदार डॉ निंबाळकरांनी असे वक्तव्य करून खऱ्या अर्थाने माय मराठीची प्रतारणा केली आहे खुद्द त्याच या ठिकाणी अतिक्रमित असून त्यांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत, केवळ तालुक्यातल्या मूठभर कन्नडिगाना खूष करण्यासाठी त्यांनी असे वक्तव्य केले आहे.येत्या काळात त्यांनाच हा भूभाग सोडून इतरत्र जाण्यास भाग पाडू.Khanapur mes

यावेळी बोलताना पांडू सावंत म्हणाले तालुक्यातले विकासाचे अपयश लपविण्यासाठी यासाठी चर्चेत राहण्याचा हेतूने त्यांनी हे वक्तव्य केले आहे हे मराठी मतांवर निवडून येऊन त्या मतदारांशी त्यांनी चेष्टा केली आहे निरंजन सरदेसाई म्हणाले, राज्यद्रोह या शब्दाचे व्याख्या त्यांना समजू नये इतक्या त्या अडाणी नाही ही ज्या मराठी जनतेने त्यांना पसंती दिली त्यांनी वेळीच सावध व्हावे, अन्यथा इथल्या मराठी जनतेचा स्वाभिमान काढून घेण्यात येईल वरिष्ठांना खूश करण्यासाठी त्यांनी खुद्द इथल्या जनतेला अपमानाची वागणूक दिली असल्याचे मत त्याने मांडले.

यावेळी गोपाळ पाटील,जगन्नाथ बिर्जे, सुरेश देसाई,राजू पाटील, कृष्णा कुंभार, विनायक सावंत, सूर्याजी पाटील, पी एच पाटील, रणजीत पाटील आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.