बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद करजोळ यांनी आगामी अर्थसंकल्पात जांबोटीचा मध, शहापूरच्या साड्या आणि आंब्याचे पापड यासह चार स्थानिक उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी शासन पावले उचलणार आहे.अशी माहिती दिली आहे.
मंत्र्यांनी “जांबोटी मध” उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रिया प्रकल्पाच्या स्थापनेबाबत सविस्तर अहवाल मागितला आहे.तसेच बेळगावच्या शहापूर साडीला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक असलेला प्रकल्प अहवाल सादर करावा.
बाजाराचा विस्तार आणि रोजगार निर्मितीचा सर्वंकष अहवाल चार दिवसांत सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
कोणत्याही कृषी किंवा बागायती उत्पादनातून मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे सुलभ करण्यासाठी योजना तयार केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना फायदा होईल आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल असे नवीन प्रकल्प तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी विविध विभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.