Sunday, December 29, 2024

/

हुतात्मा दिन-शहर समितीचे आवाहन

 belgaum

भाषावार प्रांतरचना करण्यासाठी नेमलेल्या फाजल्अली कमिशनच्या शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारण्याची घोषणा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवर केली.या घोषणेनुसार मुंबई केंद्रशासीत तर
बेळगाव,धारवाड,विजापूर,कारवार जिल्हे कर्नाटकात घालण्याची शिफारस होती.ही घोषणा ऐकताच मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागात व सीमा भागातील मराठी जनतेत प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला.

दिनांक 17जानेवारी 1956रोजी बेळगाव येथे झालेल्या गोळीबारात मारुती बेन्नाळकर,मधू बांदेकर,महादेव बाराखडी,लक्ष्मण गावडे आणि निपाणीत कमळाबाई मोहिते यांना हौतात्म्य प्राप्त झाले. सत्याग्रही बाळू निलजकर,नागप्पा होसूरकर, गोपाळ अप्पू चौगुले यांचे तुरुंगात निधन झाले. या सारयांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

सोमवार दि 17जानेवारी 2022रोजी सकाळी 9.00वाजता हुतात्मा चौक येथे कोरोनाबाबतचे सारे नियम पाळून श्रद्धांजली अर्पण करावयाची आहे .

मराठी भाषिक जनतेने आपापले व्यवहार बंद ठेवून वेळेवर हजर राहावे असे आवाहन बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी सरचिटणीस श्री मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे चिटणीस रणजित चव्हाणपाटील यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.