5 राज्यात होणार्या विधानसभा निवडणुकांची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील 690 विधानसभा जागांवर निवडणुका होणार आहेत.
10 मार्चला पाचही राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइनच्या मुहूर्तावर गोव्यात 40 जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील निवडणुकां संदर्भात बेळगाव परिसरातील नेतेमंडळींची रेलचेल राहणार असून गोव्याच्या निवडणुकीवर बेळगावातील राजकीय व्यक्तींचा प्रभाव पाहायला मिळणार आहे.
कोरोना काळात निवडणूक घेणे अत्यंत आव्हानात्मक असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आणि मतदान प्रक्रिया पार पडताना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य आयुक्त सुशिल चंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
हे पत्रकार परिषद होताच कर्नाटकातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांचे गोवा निवडणुकीसंदर्भातील नियोजन सुरू झाले आहे विशेषता 100 किलोमीटरच्या टप्प्यात गोव्याची संलग्न असणाऱ्या बेळगाव येथून निवडणूक यांचे अनेक प्रकारे नियोजन होणार असून सूत्रे बेळगावातून हलणार आहेत.
बेळगाव आणि गोवा हे संबंध अधिक दृढ आहेत. गोवा मुक्ती स संग्रामाचे नियोजन बेळगावच्या माध्यमातूनच झाले होते .अनेक क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक बेळगाव मार्गे गोव्याला गेले होते. त्यामुळे गोव्यात निवडणुका असल्या की बेळगाव ची मदत घेतली जाते. कोरोना आहे त्यामुळे काही निर्बंध असले तरी गोव्याचे राजकारणी निवडणुकीच्या तयारीसाठी बेळगावचा उपयोग करतात. विशेषता काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राजकीय पक्षांनी बेळगाव येथील आपल्या नेत्यांनाच गोव्याच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी नेमण्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके, भाजप नेते किरण जाधव सह बेळगाव मधील अनेक नेते भाजपचा तर काँग्रेसचे काँग्रेसचा प्रचार करताना दिसतील.
काँग्रेस पक्षाचे प्रभारी म्हणून दिनेश गुंडू राव हे गोव्यात काम पाहत असले तरी त्यांच्या बरोबरीने बेळगाव येथील काँग्रेस नेते सुनील हनमन्नावर निवडणुकीचे नियोजन करत आहेत. याचबरोबरीने भाजपच्या आमदार खासदार व नेत्यांनीही गोव्याच्या निवडणुकीच्या नियोजनासाठी तयारी सुरू केली असून ते ही जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचे बिगुल वाजताच गोव्यात संदर्भातील हालचालींना बेळगावात सुरुवात होणार हे निश्चित आहे.