कोंडसकोप्प (ता. बेळगाव) नजीकच्या हनुमंतवारी माळरानावर मानवी कवटी व हाडे आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
कोंडासकोप नजीकच्या हनुमंतवारी परिसरात आढळलेल्या मानवी कवटी व हाडांसंदर्भात मारुती पिराजी बेळगावकर (रा. बस्तवाड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. हनुमंतवारी या माळरानावर मानवी हाडे व कवटी पडल्याचे प्रथम बेळगावकर यांच्या निदर्शनास आले.
त्यानंतर ही माहिती वाऱ्यासारखी ग्रामस्थांमध्ये पसरली. कवटी व हाडे पडलेल्या ठिकाणी कांही अंतरावर गवत जाळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तिथे ॲसिड ओतून एखाद्याचा खून केला असावा असा संशय बळावत चालला आहे. कवटीपासून जवळच पडलेल्या मानवी हाडांच्या जवळ जबडा जीन्स पॅन्टचा तुकडा सापडला आहे. यावरून एखाद्या तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी या परिसरात म्हणून ॲसिडने मृतदेह जाळण्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी मानवी हाडे व कवटी ताब्यात घेतली असून त्यांचे वैज्ञानिक पृथक्करण केल्यानंतरच या प्रकरणाचे गुढ उलगडणार आहे. दरम्यान, बेळगाव शहर परिसरातील एखादी व्यक्ती अचानक गायब झालेली असेल किंवा बरेच दिवस झाले घरी परतलेली नसेल अशा व्यक्तींच्या नातलगांनी अथवा ज्यांना तशी कांही माहिती असेल अशांनी पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस खात्यातर्फे करण्यात आले आहे.
हिरेबागेवाडी पोलीस ठाणे बेळगाव शहर : 0831 -2405280, पोलीस इन्स्पेक्टर हिरेबागेवाडी पोलीस ठाणे : 9480804032, किंवा पोलीस कंट्रोल रूम बेळगाव शहर : 0831 -2405278.