तुरकमट्टी येथे लष्कर विभागाची जमीन आहे या जमिनीत उगवलेल्या गवताचा वणवा पेटल्याने लाखों रुपयांचा गवत आगीत भस्म झाले होते रविवारी सायंकाळी ही घटना घडली आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवली.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार या संरक्षण खात्याच्या जमिनीत गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होत असते पंधरा ते वीस एकर शेत जमिनीतील गवताला रविवारी सायंकाळी आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले.
यापूर्वी या गवताचा चारा म्हणून उपयोग लष्कर विभाग त्यांच्या जनावरांना करत होते मात्र गेल्या काही दिवसांत सरकारने ही जनावरे हलविल्याने या गवताचा उपयोग होत नाही यामुळे गवत आगीत जळाले आहे.
या आगीची राख हवेत उडून वाऱ्याने बेळगाव शहरात देखील पडली होती .सदर चारा गवत आजूबाजूच्या भागातील शेतकऱ्यांना दिल्यास त्यांच्या जनावरांना याचा पोटाचा प्रश्नही सुटू शकतो मात्र लष्कर विभाग कोणालाही याचा उपयोग करण्यास देत नसल्याने अखेर याला आग लागली जाते त्यामुळे हे गवत जळून जाते याच आजूबाजूच्या भागातील नागरिकांना याचे आश्चर्य वाटत आहे.