बेळगाव येथील मास्टरशेफ हॉटेलमध्ये शॉर्टसर्किटमुळे ब्रॉयलरला आग लागल्याची घटना घडली आहे.
बुधवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास काँग्रेस रोडवरील मास्टरशेफ हॉटेल येथे ही घटना घडली.
हॉटेलच्या किचनमध्ये, धूर बाहेर काढण्यासाठी सज्ज असलेल्या ब्रॉयलरला शॉर्ट सर्किटने आग लागली.
आग लागल्याने हॉटेलमध्ये दाट धुराचे लोट पसरले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन अधिकारी बी.आर. टक्केकर यांच्या नेतृत्वाखालील एक पथक दाखल झाले आणि आग विझवण्यात आली आहे.
या घटनेत दीड लाख रु. नुकसान झाले. ही घटना टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे.कोणतीही जीवित हानी सुदैवाने झाली नाही.