बेळगाव महा पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही मानाची महत्त्वाची पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या नंतर आता दोन्ही पदांसाठी केव्हा निवड प्रक्रिया पार पाडली जाणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 5 फेब्रुवारीला बेळगाव महापौर-उपमहापौर निवड प्रक्रिया होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कलबुर्गी महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुक धर्तीवर बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याचे कळते.दरम्यान बेळगाव महापौर-उपमहापौर निवडणुकीसंदर्भात प्रादेशिक आयुक्त कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष वेधून जाणार आहे.
दरम्यान के पी सी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी शहराच्या आमदारांवर आणि सरकारवर बोचरी टीका करत मनपा निवडणूक जाणून बुजून उशीर घेत असल्याचा आरोप केला होता त्यानंतर महापौर निवडणूकीच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत.
नगर विकास खात्याच्या अधिकृत माहिती नंतरच महापौर- उपमहापौर निवड होणार आहे. लवकरच महापौर उपमहापौरपदाची निवडणूक जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी 11 जानेवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक होणार अशा चर्चेला ऊत आला होता. मात्र चर्चा निवडणूक झाली नसल्याने केवळ अफवाच ठरली. महापालिका निवडणूक होऊन चार महिने उलटले पण अद्यापही सभागृह अस्तित्वात आलेले नाही.
महापौर-उपमहापौर निवड झाली नसल्याने नगरसेवकांना अधिकार प्राप्त कधी होणार असा मुद्दा उपस्थित झाला आहे.त्यामुळेच महापौर-उपमहापौर निवडणुकीचे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.सरकारने आता दोन्ही जागांसाठी नवीन आरक्षण जाहीर केले आहे.