मागील 70 वर्षात महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या लढाऊ बाण्याने एक वेगळे स्थान निर्माण केलेले ज्येष्ठ नेते ,तसेच सीमावासीयांचे मार्गदर्शक व आधारवड भाई एन डी पाटील यांची प्रकृती काल रविवारी जास्तच बिघडली आहे.
संपूर्ण सीमाभागात 17 जानेवारी हुतात्मा दिन पाळला जात असताना भाई एन डी पाटील यांच्या आजारपणाची बातमी सीमावासियांच्या दृष्टीने यातनादायक ठरणार आहे.
रविवारी प्रकृती बिघडल्यामुळे भाईंना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .
मात्र गेल्या तीन ते चार दिवसात त्यांच्या पोटात अन्न पाणी न गेल्यामुळे उपचारांना ते प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या दीड वर्षापासून स्मृतिभ्रंश झाल्यामुळे ते आजारी होते. सध्या प्रकृती बिघडल्यामुळे खासगी इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना दोन वेळा ब्रेन स्ट्रोक आला असून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यांचे शरीर प्रतिसाद देत नसल्याची माहिती सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे.
सीमाप्रश्न लढयाच्या दृष्टीने भाई एन डी पाटील यांचे योगदान मोठे आहे. सुरुवातीपासूनच मार्गदर्शक आणि आधारवड नेते म्हणून एन डी पाटील यांनी काम केले आहे. त्यामुळे हुतात्मा दिनी त्यांच्या प्रकृती अस्वस्थाची बातमी सीमावासियांना यातना देणारी ठरत आहे.