बेळगावच्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे आज गोकाक तालुक्यातील कायमचे अपंगत्व आलेल्या 11 मुलांना व्हील चेअर्सचे वाटप करण्यात आले आहे.
गोकाकचा गटशिक्षणाधिकार्यांनी आपल्या तालुक्यातील 32 निवडक गरजू अपंग मुलांच्या कुटुंबियांना मदती दाखल व्हील चेअर्स, वॉकर्स आणि श्रवण यंत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या हेल्प फाॅर नीडी शाखेकडे केली होती.
त्यांच्या विनंतीला मान देऊन हेल्प फाॅर नीडीतर्फे आज गुरुवारी गोकाक तालुक्यातील कायमचे अपंगत्व आलेल्या 11 मुलांना व्हील चेअर्सचे वितरण करण्यात आले.
सदर मदतीबद्दल हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गोकाकचे गटशिक्षणाधिकारी जी. बी. बळीगार, एम. बी. पाटील, दवयेरी, हेमा कौजागीरी, इरण्णा संपगावी, दीपक बसरीकट्टी, राहुल नाईक आदी उपस्थित होते.