कंग्राळी खुर्द ग्रामपंचायत कडून गावातील नागरिकांना कचरापेटी चे वाटप करण्यात आले ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत चालू असलेल्या कचरा निर्मूलन करण्यासाठी प्रत्येक घरात एक कचरा पेटी (डस्टबिन) देण्यात आली.
याची सुरूवात वार्ड क्रमांक 1 मधुन ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील, राकेश धामणेकर, वैजनाथ बेन्नाळकर व सदस्या मधु पाटील यांच्या हस्ते नागरिकांना कचरा पेटीचे(डस्टबिन)वाटप करण्यात आले.
तो कचरा गावामध्ये येणाऱ्या कचरा गाडीतच टाकावा असे आवाहन करण्यात आले. तसेच मोकळ्या जागेत कचरा टाकणाऱ्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच 1000 रू. दंड वसूल करण्यात येईल.आजवर ग्रामपंचायतने कचरा टाकणाऱ्यांच्याकडून जवळपास 30000 रू. दंड वसूल केला आहे.
कचरा टाकणाऱ्या व्यक्तीचे नाव ग्रामपंचायतीत कळविल्यास, माहिती देणाऱ्या ला योग्य ते बक्षीस देण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गोपाळ पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.