बेळगाव शहरातील उज्वलनगर सहावा क्रॉस येथील रस्त्याशेजारी असलेल्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली असून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्यामुळे नागरिकात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
उज्वलनगर सहावा क्रॉस येथील जलवाहिनीला लागलेली गळती इतकी मोठी आहे की या ठिकाणी संपूर्ण रस्त्यावरून पाणी वाहत असून सदर पाणी चक्क उकिरड्यात वाया जात आहे. अलीकडे कांही दिवसापासून शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर या पद्धतीने दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तरी या भागाचे लोकप्रतिनिधी आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उज्वलनगर सहावा क्रॉस येथील जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करण्याचा आदेश द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.