भाजप महिला मोर्चा बेळगाव ग्रामांतर च्या उपाध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत यांनी आज खानापूर तालुक्याचे नूतन तहसीलदार प्रवीण जैन यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. याचबरोबरीने खानापूर तालुक्यातील सर्व समस्यांची माहिती त्यांना देण्यात आली.
आज खानापूर येथील तहसिलदार कार्यालयात डॉ सोनाली दाखल झाल्या होत्या. त्यांच्या सोबत डॉ. समीर सरनोबत, बसवराज कडेमनी ईश्वर सानिकोप आदी उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार प्रवीण जैन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच खानापूर तालुक्यात नियुक्ती मिळाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी खानापूर तालुक्याच्या जनतेला सोसाव्या लागणाऱ्या विविध समस्यांची माहिती तहसीलदार प्रवीण जैन यांना दिली असता आपण या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
तहसीलदार म्हणून दाखल झाल्यानंतर आपण नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे याची जाणीव डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी नूतन तहसीलदारांना करून दिली असून त्यांनी या सर्व समस्यांवर उपाय शोधून दिलासा देण्याची जबाबदारी घेतली आहे.