विकेंड कर्फ्यू सुरू झाला आणि शुक्रवारी सकाळपासूनच पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांना थांबवणे, वाहनांची नाकेबंदी व दंडात्मक कारवाई सुरू केली होती.
रविवारी बेळगावातील चन्नम्मा सर्कल येथे डॉक्टरांनी पोलिस अधिकाऱ्यांनाच मास्क घालण्याची विनंती केली. डीसीपीसह पोलीस अधिकाऱ्यांशी काही काळ वाद घातला .
डीसीपी रवींद्र गडादी आणि एसीपी सदाशिव कट्टीमनी यांनी एक डॉक्टर आणि ड्रायव्हर कार मध्ये मास्क लावत नसल्याबद्दल हटकले.
दरम्यान गाडीत बसलेले डॉक्टर भांडू लागले.डीसीपी रवींद्र यांनी मास्क लावा, असे सांगताच हा प्रकार घडला.
अखेर आम्ही तुमच्या भल्यासाठीच सांगत आहोत असे डीसीपी न सांगताच संबंधित डॉक्टर हात जोडून निघून गेले.