मकर संक्रांतीनिमित्त जय जवान जय किसान खानापुर प्रस्तुत आणि श्री सुब्रमण्यम युवक संघ माचीगड आयोजित भव्य हाफ -पीच क्रिकेट स्पर्धेला नुकताच उत्साहात प्रारंभ झाला.
सदर भव्य हाफ -पीच क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ काल शुक्रवारी सकाळी पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे भाजप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि नियती फाउंडेशन बेळगावच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते यष्टि पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर डॉ. सरनोबत यांनी स्वतः क्रिकेट खेळून स्पर्धेचा शुभारंभ केला.
बिजगरणी चे गाव पाटील बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या उद्घाटन समारंभास अन्य पाहुणे म्हणून कंत्राटदार अशोक जोशिलकर, बँकेचे संचालक पप्पु पाटिल, शंकर पाटील, रामा अरूंदे, अनिल सुतार, जॅकी फर्नांडिस, गोपाळ कुट्रे, तुकाराम कुट्रे, बिजगर्णी ग्रा. पं. अध्यक्षा हेमलता कोलकार, तमाण्णा कोलकार, तुकाराम जाधव, तुकाराम गावडा आदी उपस्थित होते.
आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. सोनाली सरनोबत यांनी जीवनातील खेळाचे महत्व विशद केले. खेळांना प्रोत्साहन देणे गरजेचे असून खेळांमुळे मन आणि शरीर तंदुरुस्त राहते असे त्यांनी स्पष्ट केले. अभ्यासाबरोबरच पालकांनी आपली मुले खेळात रस घेतील याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, खोखो आदी विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी खानापूर तालुक्यात भव्य क्रीडा संकुल बांधण्यात यावे अशी मागणी आम्ही सरकारकडे केली आहे आणि त्यासाठी पाठपुरावाही केला जात आहे, अशी माहितीही डॉ सरनोबत यांनी दिली.
श्री सुब्रमण्यम युवक संघ माचीगड आयोजित मर्यादित 6 षटकांच्या या हाप -पीच क्रिकेट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे 11,022 रुपयांचे बक्षीस डाॅ. सोनाली सरनोबत यांनी पुरस्कृत केले आहे. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक 7,022 रुपयांचे असून शिस्तबद्ध संघाला 2,022 रुपये दिले जाणार आहेत. याव्यतिरिक्त उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकावीरासाठी आकर्षक वैयक्तिक बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत.