Friday, December 27, 2024

/

आजपासून कार्यान्वित मनपाची ‘कोरोना वाॅर रूम’

 belgaum

बेळगावसह राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचे संकट वाढले आहे. परिणामी सरकारने कडक निर्बंध लागू करताना दोन आठवडे रात्रीचा कर्फ्यूसह शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू ही लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने ‘कोरोना वाॅर रूम’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून आजपासून ही वाॅर रूम कार्यान्वित झाली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महापालिकेने कोरोनाव्हायरस स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून ही वाॅर रूम कार्यरत होणार असून महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढील दोन महिन्याच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. चार दिवसात शहरातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना नियंत्रणाबाबत महत्वाची बैठक गुरुवारी महापालिकेत पार पडली. मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या अनुपस्थितीत अधीक्षक अभियंता लक्ष्मी निप्पाणीकर आणि आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी ही बैठक घेतली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महापालिकेने शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विशेषाधिकारी व त्यांच्या मदतीला एक पथक स्थापन केले होते. यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन पथकांची स्थापना केली जाणार आहे. कोरोना नियंत्रणात वाॅर रूमची भूमिका महत्त्वाची ठरते. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत वाॅर रूम महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे महापालिकेने या वेळी तातडीने वार रूम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना बाधितांच्या प्रथम संपर्कात येणाऱ्या व्यक्तींसाठी 7 दिवसांचे विलगीकरण असणार आहे. नियमांबाबत महापालिकेची जागृती मोहीम सुरूच आहे. गेल्या बुधवारपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे. काल गुरुवारी कांही ठिकाणी दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली. आता आजपासून कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.

या अनुषंगाने महापालिकेत नागरिकांना प्रवेश बंदी केली जाणार आहे. तातडीच्या कामासाठी जे कार्यालयात जातील त्यांना फेसमास्कची सक्ती असेल. मास्क न घालता जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बैठकीत मास्क सक्तीच्या आदेशाच्या कार्यवाहीसाठी 14 पथकांची स्थापना करण्याचा निर्णयही झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.