कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी बेंगळुरूमधील तसेच राज्याच्या इतर मध्यवर्ती कारागृहातील गैरव्यवहार रोखण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा आसरा घेतला आहे.
कैद्यांना बडे व्यावसायिक, उद्योगपती आणि उच्च प्रभावशाली व्यक्तींना धमकीचे कॉल करण्यापासून रोखण्यासाठी, परप्पन अग्रहार आणि बेळगाव सारख्या सर्व तुरुंगाच्या आवारात जॅमर बसवले जाणार आहेत.
कारागृहात बसूनच कुख्यात रावडी शीटर्सनी राज्यातील अनेक उद्योगपतींना फोन कॉल केले आहेत. निर्दिष्ट खाते क्रमांकांवर पैसे हस्तांतरित न केल्यास त्यांना ठार मारले जाईल अशी धमकी दिली आहे. त्यामुळे कुख्यात रावडी शीटर्स असलेल्या सेलच्या आवारात जॅमर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 60 कोटी रुपये खर्च येणार आहे.अशी माहिती खुद्द गृह मंत्र्यांनी जारी केली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेची शाखा बेंगळुर मध्ये रुजू होण्याची शक्यता आहे. केंद्राने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. राज्यातील बल्लारी आणि बेळगावी येथे हायटेक फॉरेन्सिक प्रयोगशाळा येत असून त्यामुळे पोलिसांना पुरावे मिळून प्रकरणे लवकर निकाली काढता येतील.
त्यांनी असेही सांगितले की अनेक प्रकरणांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. कारण पोलिसांना न्यायवैद्यक प्रयोगशाळांकडून अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. जे पोलिसांना शक्य तितक्या लवकर तपास पूर्ण करण्यासाठी आणि आरोपपत्र दाखल करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात.