बेळगाव नागरी विकास प्राधिकरणाने आपल्या कार्यक्षेत्रात करावयाच्या विविध कामांसाठी विविध निविदा काढल्या आहेत. या अंतर्गत विकास कामे करण्याच्या प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे.
शाळा क्रमांक 35, रामतीर्थ नगर, बेळगाव येथे 110 एचटी लाईन बफर झोनच्या अंतर्गत उद्यानाचा विकास केला जाणार आहे. या कामाचा अंदाजे खर्च ८८७७१४२.६९ इतका आहे.
शाळा क्रमांक 35, रामतीर्थ नगर, बेळगाव येथे 220 एचटी लाईन बफर झोनच्या अंतर्गत असलेल्या खुल्या जागेसाठी उद्यानाचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत 8843014.54 इतकी आहे.
शाळा क्रमांक 35, रामतीर्थ नगर, बेळगाव येथे 220 एच टी लाईन बफर झोनच्या खाली असलेल्या खुल्या जागेसाठी फलोत्पादनाचे काम उपलब्ध करून देण्याचीही निविदा काढण्यात आली असून अंदाजे खर्च 8920570.65 इतका आहे.
रामतीर्थ नगर बेळगाव येथे 220 एचटी लाईनच्या अंतर्गत बसणाऱ्या सजावटीच्या दिव्यांचा पुरवठा आणि फिक्सिंग केले जाणार आहे. प्लॉट क्र 1663 ते 2070 या दरम्यान 742 मेट्रिक टनचे हे काम होणार असून अंदाजे किंमत 6181132.55 इतकी आहे.
शाळा क्रमांक 35, रामतीर्थ नगर, बेळगाव येथे 220 एचटी लाईन बफर झोनच्या खाली खुल्या जागेसाठी कंपाउंड वॉल बांधले जाणार असून याचा अंदाजे खर्च 8886302.55 इतका आहे.
बुडा ऑफिस ऍप्रोच रोड,बेळगाव मध्ये सुधारणा काम केले जाणार असून अंदाजे खर्च ७२६९९५३.८६,
बुडा कार्यालय, बेळगावी येथे वर्ग A रेकॉर्डचे स्कॅनिंग – अंदाजे खर्च रु. ११७८६५४.०,
बुडा योजना क्रमांक ५६, कुमार लेआउट येथे २०२१-२२ या वर्षासाठी पाणीपुरवठा वितरण नेटवर्कची देखभाल – अंदाजे खर्च रु. ८३१४२७.००,
बुडा योजना क्रमांक 35, 43 आणि 43A, रामतीर्थ नगर आणि बुडा कार्यालय परिसर, या भागात 2021-22 या वर्षासाठी पाणी पुरवठा वितरण नेटवर्कची देखभाल करणे.
आदी नियोजित कामांच्या निविदा काढण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे.