पोलीस खात्यात बजावलेल्या अतुलनीय सेवेबद्दल बेळगावच्या दोघांना यंदाचे राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले असून ही बाब बेळगावसाठी अभिमानास्पद आहे. उद्याच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी त्यांना हे पदक प्रदान केले जाणार आहे.
शहरातील खडेबाजार पोलीस ठाण्याचे सीएचएस शंकरराव मारुतीराव शिंदे आणि जिल्हा सशस्त्र दलाचे (डीएआर) एआरएसआय दस्तगीर मोहम्मद हनीफ घोरी या दोघांना राष्ट्रपती पोलीस पदकाचा सन्मान मिळाला आहे.
यापूर्वी बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून सेवा बजावलेले आणि सध्या बेंगलोर शहर रहदारी संयुक्त पोलीस आयुक्त असलेले डॉ. बी. आर. रविकांतेगौडा यांना देखील यंदाचे राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे.
राज्यातील एकूण 19 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त झाले आहे.