कोरोना चा विस्तार वाढू नये म्हणून जारी करण्यात आलेल्या विकेंड कर्फ्यू ची अंमलबजावणी शनिवारी पहिल्या दिवशीच चांगल्या पद्धतीने करण्यात आले असून महाराष्ट्र कर्नाटक सीमा हद्दिवर कडक पोलिस बंदोबस्त तसेच अकारण प्रवास करणाऱ्या वाहनांची जप्ती या पद्धतीने पोलिसांनी कारवाई केली आहे.
राज्यात कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने कर्फ्यु लागू केला. या पार्श्वभूमीवर शनिवारी कर्नाटक महाराष्ट्र सीमा हद्दीवर चौख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांच्या अडवणूक करून चौकशी करण्यात येत होती.
कोरोना च्या पहिल्या लाटेत कोणत्याही चोरट्या मार्गाने विना rt-pcr वाहतूक होऊ नये, प्रवास केला जाऊ नये याची खबरदारी घेण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक सात जानेवारीच्या रात्री आठ पासून कर्फ्युला सुरुवात झाली. शनिवारी सायंकाळपर्यंत अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरणारी 39 वाहने पोलिसांनी जप्त केले आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ विक्रम आमटे यांनी ही माहिती दिली आहे .शुक्रवारी दुपारी पोलिस आयुक्तांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.हा निर्णय नागरिकांच्या हितासाठी आहे तो पूर्ण करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला त्या काळात अनावश्यकपणे कोणी फिरू नये. असे आवाहन करण्यात आले होते.
मात्र कोणत्याही कारणाशिवाय फिरणारी 39 वाहने पोलिसांनी जप्त केली असून विना मास्क फिरणाऱ्या 258 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. रविवारी ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.