गोवा राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला गेलेल्या राष्ट्रीय पक्षातील एका नेत्याने स्वतःच अश्लीलतेचा बाजार मांडत मर्यादा ओलांडली आहे. नशेत स्वतःच स्वतःचे नग्न फोटो व्हायरल केले आहेत. विशेषतः हे फोटो पक्षाच्या कर्नाटक राज्याच्या राज्यस्तरीय ग्रुपवर त्याने स्वतःच टाकले असून बेधुंद अश्लीलतेचा नंगा बाजार किळसवाणा ठरला आहे.
राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हा अध्यक्षाच्या प्रकारामुळे तो नेता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एका खाटेवर पडलेला आणि नग्न अवस्थेतला त्यांचा फोटो त्यांनी स्वतःच एका व्हॉट्सॲप ग्रुप वर टाकला आहे.
निवडणूक प्रभारी म्हणून काही मतदार संघाच्या प्रचाराची जबाबदारी असताना या महोदयांनी नेमके काय चालविले आहे?असा प्रश्न निर्माण करणारी कृती त्यांनी केली असून फक्त त्या पक्षाचीच सोडा तर बेळगाव जिल्ह्याचीही लाज काढली आहे.
त्या पक्षाच्या ग्रुप वर पडलेला हा फोटो मात्र पक्षातीलच व्यक्तींनी स्क्रीन शॉट काढून व्हायरल केला आहे. यामुळे दुसऱ्या पक्षातील लोकांना आयतेच कुरण मिळाले आहे. त्या नेत्याच्या या अश्लील कृत्याचा मुद्दा देखील गोव्याच्या निवडणुकीत बनला असून बेळगावातील अनेक माध्यमानी देखील या बातमीची दखल घेतली आहे.
निवडणुकीच्या प्रचाराला गेलात की ऐयाशी करायला असा प्रश्न सामान्य जनतेने विचारला तर चुकले कुठे?आता या कृत्याचे त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांनीच उत्तर देण्याची गरज आहे.