गोव्याहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा आता rt-pcr निगेटिव प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. कर्नाटक सरकारने काल घेतलेल्या निर्णयानुसार केरळ महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यावरून बेळगावकडे दररोज च्या स्वरुपात प्रवास करणाऱ्यांची मोठी गैरसोय होणार असून रोज आर टी पी सी आर प्रमाणपत्र घेण्याची वेळ त्याच्यावर येणार आहे .
बेळगाव आणि गोवा हे व्यापारी संबंध मोठे आहेत .बेळगावातून गोव्याकडे पर्यटनासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात जातात. त्याच पद्धतीने खरेदीसाठी तेथील नागरिक बेळगावला प्रवास करीत असतात .
त्या पार्श्वभूमीवर सध्या सुरल आणि अनमोड या दोन ठिकाणी चेक पोस्ट उभारून तपासणी सुरू करण्यात आले असून rt-pcr प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात असल्यामुळे सध्या गोव्याकडून बेळगाव ला खरेदीला येणाऱ्या लोकांना rt-pcr घेऊनच यावे लागत आहे.
कर्नाटक सरकारने तब्बल तीन तास बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या सीमारेषा तुन कर्नाटकात प्रवेश करणार नाही कडक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.
कोणत्याही पद्धतीने कर्नाटकातील रुग्णांची संख्या वाढू नये यादृष्टीने खबरदारीचे उपाय कर्नाटक सरकार घेत आहे. त्यामुळेच आता ही परिस्थिती निर्माण झाली असून रुग्ण संख्या कमी झाल्यास त्यात शैथी ल्य येऊ शकते असे कर्नाटक सरकारने जारी केले आहे.