महामारी कोरोना ही आता सर्वसामान्य बाब बनत चालली असून लोकांच्या ती अंगवळणी पडल्या सारखी झाली आहे. आता बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ हे स्वतःच कोरोनाग्रस्त झाले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांची नुकतीच रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात आली त्यात ते पॉझिटीव्ह आल्यानंतर खात्री करून घेण्यासाठी त्यांची आरटी -पीसीआर तपासणी करण्यात आली
या तपासणीमध्ये देखील ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे आरोग्य खात्यातर्फे सांगण्यात आले आहे मात्र याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जाहीर वाच्यता केलेली नाही.
गेला डिसेंबर महिन्यामध्ये विधानपरिषद निवडणुक काळात जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बदली झाली होती. मात्र अलीकडे गेल्या 8 -10 दिवसापासून पुन्हा त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज पहावयास सुरुवात केली होती.
मात्र त्यानंतर आता पुन्हा कोरोना संसर्ग झाला असल्यामुळे त्यांना उपचारासाठी मेडिकल लिव्ह घ्यावी लागणार आहे. परिणामी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुढील कांही दिवस जिल्हाधिकारी नसणार आहेत.