कर्नाटक राज्य विधानसभेचे संयुक्त अधिवेशन 14 ते 25 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केले जाईल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बोम्मई म्हणाले की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
“कोविडची परिस्थिती आणि व्यवस्थापन, शाळा आणि महाविद्यालयांना भेडसावत असलेल्या समस्या, शाळा, महाविद्यालये आणि संस्थांकडून आलेल्या याचिका तज्ञ समितीसमोर ठेवण्यात आल्या आहेत. तज्ञांच्या अहवालाच्या आधारे योग्य निर्णय घेतला जाईल,”असे बोम्मई म्हणाले.
बीबीएमपीच्या निवडणुकाही चर्चेला आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
निधी वाटपात भेदभाव केल्याचा काँग्रेसचा आरोप आणि बीबीएमपी निवडणुकीत भाजपला मदत करण्याच्या उद्देशाने बीबीएमपीच्या बैठका घेतल्या जात असल्याच्या आरोपावरून प्रश्नाला उत्तर देताना बोम्मई म्हणाले: “काँग्रेसचा हेतू आरोप करणे हा आहे. त्यांनी काय केले ते त्यांना आठवू द्या. जेव्हा ते सत्तेत होते.तेंव्हा त्यांनी काय केले याचे उत्तर पहिला मागा.