2022 या नवीन कॅलेंडर वर्षातील 55 तासांच्या दुसऱ्या विकेंड कर्फ्युला बेळगाव सह राज्यात सुरुवात झाली आहे विशेषतः बेळगाव हा सीमा वर्ती जिल्हा असल्याने या जिल्ह्यात विकेंड कर्फ्युची कडक अमलबजावणी केली जात आहे.शुक्रवारी रात्री 10 सोमवारी पहाटे 5 असे 55 तास कर्फ्यु सदृश्य स्थिती असणार असून या काळात अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात विकेंड लॉकडाउन जारी केला आहे. मागील सप्ताह नंतर काल शुक्रवारी रात्री दहा वाजल्यापासून नवीन वर्षातला दुसरा वीकेंड लॉकडाउन सुरू झाला आहे.
कोरोना संक्रमणाचा वाढता धोका पाहून शासनाने विकेंड लॉकडाउन घोषित केला आहे. दरम्यान मागील आठवड्यात शासनाने शुक्रवारी रात्री दहा ते सोमवारी पहाटे पाच वाजेपर्यंत विकेंड लॉकडाउन म्हणून घोषित केला. काल शुक्रवारी रात्री दहा वाजल्यानंतर बेळगाव बाजारपेठेतील सर्व व्यवहार बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
आज शनिवारी सकाळ पासून बेळगाव शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर वाहतूक मंदावलेली दिसून येत आहे. विकेंड लॉकडाउन काळात विविध सेवा बंद ठेवण्यात आल्या असून, काही सेवा सशर्त सुरू राहणार आहेत.
औषध पुरवठा, औषध दुकान,मांस, धान्याची विक्री, किराणा दुकान, फळ आणि भाजीपाला, मासे विक्री, डेअरी दूध विक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट मधून पार्सल घेऊन जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. परिवहन सेवा सुरू ठेवण्यात आली आहे. खाजगी प्रवास करताना त्यामागील कारण देणे आवश्यक आहे.